या जिल्ह्यातील विमा धारक शेतकऱ्यांना मिळणार २५ % आगाऊ विमा रक्कम...

  

 या जिल्ह्यातील विमा धारक शेतकऱ्यांना मिळणार २५ % आगाऊ विमा रक्कम...


नांदेड जिल्ह्यात पीक परिस्थिती बघता पीक विमा हंगामातील मध्यावधी नुकसान भरपाई अग्रिम देण्याचे निर्देश संयुक्त समितीने दिले आहेत

अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात पिंकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांना आता नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे,त्यामुळे अधिकची नुकसान भरपाई हि द्यावी लागणार आहे.
जुलै ते ऑगस्ट महिन्यात अवेळी पावसामुळे सोयबीन,कापूस,तूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

अशावेळी विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानिकरिता २५ टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी तात्काळ अधिसूचना काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा समितीमार्फत जिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

समितीने केलेल्या या सेर्वेक्षणात सर्व तालुक्यात पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अहवाल समितीने दिला आहे.या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परीस्थिती अधिसूचना लागू केली आहे.

या नुसार सर्व तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची २५ टक्के आगाऊ रक्कम अदा करण्याचे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला दिले आहेत. 


अधिसूचना म्हणजे काय ?

  1. पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीमध्ये पूर, पावसातील खंड अशी प्रतिकूल परिस्थिती ननिर्माण झाल्यास हि अधिसूचना काढण्याचे अधिकार जिल्हाधिकारी याना असतात.
  2. अपेक्षित असेल तर विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या तुलनेत ५० टक्के मर्यादेपर्यंत अधिक रक्कम देण्याची तरतूद आहे. 
  3. या अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अधिक रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. 

                 

👉अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  

खरीप २०२३ या हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर आणि खरीप ज्वारी या पिकांचा अधिसूचनेत केला आहे म्हणजेच या पिकांच्या नुकसानीचा विमा मिळणार आहे.

एकदंरीत,अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात पिंकाचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांना आता नुकसानीच्या २५ टक्के अधिक रक्कम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढली आहे,त्यामुळे अधिकची नुकसान भरपाई हि द्यावी लागणार आहे.या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


टिप्पण्या