जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन...
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . .
कला व साहित्य या क्षेत्रात योगदान असणाऱ्या कलाकारांना राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते. यासाठी पात्र लाभार्थीना 1 ते 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेसाठी पात्रता :-
- लाभार्थीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे.
- दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आली आहे.त्यांची वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
- कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्षे असावे.
- वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त नसावे.
- ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील. ते केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसावे.
- कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-
- वयाचा दाखल
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- प्रतिज्ञापत्र
- पति-पत्नी एकत्रित फोटो (लागू असल्यास)
- बँक पासबूक
- अपंगत्व दाखला (लागू असल्यास) राज्य व केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) यासह विविध पुरावे..
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार
पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर
डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा