प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ ...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ ... :-
कोरोना च्या काळामध्ये समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांविषयीची चिंता आणि सवेंदनशीलता जपत त्यांना आधार देण्याच्या उद्देश्याने PMGKAY म्हणजेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला एप्रिल २०२० पासुन सुरवात झाली.
सदरील योजना जगातील सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे.
केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे या योजनेचा सहावा टप्पा पुर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढीस मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारने आतापर्यंत या योजनेवर २.६० लाख कोटी रुपये निधी खर्च केला असुन पुढच्या सहा महिन्यासाठी म्हणजेच सप्टेंबर २०२२ पर्यंत आणखी ८० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या योजनेसाठी एकूण खर्च ३.४० लाख कोटी रुपये इतका असणार आहे.
या योजनेअंतर्गत ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत ध्यान्य वाटप केले जाणार आहे,सहा महिन्यात प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठीच्या रेशन धान्याव्यतिरीक्त आणखी पाच किलो धान्य/प्रति व्यक्ती /प्रतिमहीना दिले जाणार आहे,म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला त्याच्या नेहीमीच्या धान्यांच्या दुप्पट धान्य मिळणार आहे.
तसेच,स्थलांतरीत कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल,यासाठी एक देश, एक शिधापत्रिका या योजनेनुसार देशात कुठेही पाच लाख स्वस्त धान्य दुकानांमधुन लाभ घेता येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा