खरीप पीक विमा २०२४ संदर्भात नवीन नियम लागू ...!
🌱 खरीप पीक विमा 2024 साठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे त्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आली आहे.
खालील माहिती सर्व ही काळजीपूर्वक वाचावी व शेवटपर्यंत वाचावी.
यावर्षी (2024 ) खरीप विमा भरतांनी नवीन नियम आला आहे. असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड , पासबुक व सातबारा वर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे.
उदा. राम - रामराव, बालाजी - बालासाहेब - बाळू, ज्ञानेश्वर - ज्ञानदेव, प्रभू-प्रभाकर, सरुबाई-सरस्वती, चंपाबाई- चंफाबाई, महादू - महादेव, रौफ- रऊफ , कासिम - काशिम , बाबू - बाबुसाब असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या साताबरा वर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे.
🪪आधार कार्ड पासबुक व सातबारा वर स्वतःचे नाव किंवा वडीलाचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होनार आहेत . नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये वीमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकनार नाहीत.
🛑कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता. ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच पासबुक वर पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करत आहेत.
🔰यावर्षी विमा भरतानी असेच फार्म घेतले जातील यांचा सर्व डाटा व्यवस्थित आहे म्हणजे सर्व नावे बरोबर आहेत.
⚠️थोडी ही चुकी असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार यासाठी कोणतेही सीएससी केंद्रा वाले जबाबदार राहणार नाहीत.
✅टिप - आजच आपले आधार_ पासबुक व सातबारा पाहून घेणे. थोडी ही चूक असेल तर आजच दुरुस्त करून घ्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा