फळपीक विमा २०२४ योजना सुरु ...
शासनाने हवामान आधारित पीक विमा २०२४ योजनेअंतर्गत
( Crop Insurance Scheme )
१) मोसंबी २) संत्रा ३) डाळिंब ४) चिकू ५) द्राक्ष ६) पेरू
७) सीताफळ ८) लिंबू
या वरील फळपिकांसाठी विमा भरण्यास सुरुवात झाली आहे, ज्या महसूल मंडळामध्ये फळपीकाखाली २० हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन क्षेत्र आहे,अश्या महसूल मंडळामध्ये त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येवून तिथे हि योजना राबवण्यात येते.
या योजनेत सहभाग घेण्याकरीता आवश्यक असणारी पात्रता:-
* या योजनेत सहभाग घेण्याकरिता अधिसूचित क्षेत्रात,अधिसूचित फळपिकासाठी कुळाने,भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यासहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.
* पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत विमा हफ्ता जमा करून या योजनेत सहभाग घेवू शकतात.
या योजनेसाठी अपात्र असणारे :-
*फळ पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी नुकतीच लागवड केलेले शेतकरी पात्र नसतील.
*ज्या पिकांची फळबाग लावली आहे त्या पिकाचे वय शासनाने निश्चित केल्याप्रमाणे असेल तरच या फळपीक योजनेत सहभाग घेता येईल.
* फळपिकांचे उत्पादनक्षम वय वर्ष :-
* डाळिंब २ वर्षे
* द्राक्षे २ वर्षे
* संत्रा,मोसंबी,पेरू आणि सीताफळ ३ वर्षे
* आंबा आणि चिकू ५ वर्षे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा