आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई (पीएम किसान सन्मान निधी योजना)

 

आता,बोगस शेतकऱ्यावर होणार कारवाई, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट..  




पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० हजार रु.तीन टप्प्यामध्ये वितरित केले जातात. सदरील योजेनेचा १५ वा हफ्ता हा लवकरच वितरित केला आहे.तसेच या योजनेअंतर्गत पात्र नसतानाही,या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेण्याऱ्या बोगस शेतकऱ्यांकडून वसुली वसुली मोहीम राबिविली आहे.

शासकीय नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून ३१ मार्च २०२३ पासून वसुली अभियान सुरु आहे.

केंद्र सरकारकडून अवैद्यरित्य पीएम किसानचे पैसे जात असल्याची माहिती जाहीर केली होती. दरम्यान यावर सरकारने ऑडिट करत देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे, यातील अनेक शेतकरी सरकारी नोकरी करतात अथवा आयकर भरतात,नोकरदार लोक आणि आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी मोहीमही सुरू केली आहे. अशा शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पैसे परत केले नाही, तर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे.

 पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर ई-केवायसीदेखील करण्यात येत आहे. पीएम क‍िसान न‍िध‍ीअंतर्कगत २७ जुलै रोजी खातेदारांना १४व्या हप्ता देण्यात आला होता. आपल्याला १५वा हप्ता घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठी आपले ई-केवाईसी असणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यांनी PM किसान पोर्टलवर नोंदणी केलेले पात्र शेतकरी आपले आधार कार्ड घेऊन ‘ई सेवा केंद्रला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी दरम्यान पीएम किसानचा १५ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.



   

टिप्पण्या