नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचा पहिला या तारखेला मिळणार..

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनेचा पहिला या तारखेला मिळणार..


राज्य  सरकारने  जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हफ्त्याचे वितरण गुरुवारी दिनांक २६ऑक्टोबर २०२३ रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान  योजनेत भर घालण्यासाठी राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयाच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती.मात्र, 'महाआयटी'  ने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे 'नमो' च्या वितरणास विलंब होत होता.
"शेतकरी सन्मान योजनेच्या १४ व्या हफ्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्याच्या या योजनेचे पैसे वितरित करण्यात येतील,असे सांगितले जात होते.मात्र,कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवित पुम्हा पडताळणी केली,त्यामध्ये ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे.
केंद्र सरकारचा १४ वा हफ्ता ८५.६० लाख शेतकऱ्यांना मिळाला होता.नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थी संख्या ९३.०७ लाख झाली आहे.केंद्रामार्फत पीएम किसनच्या १४ व्या हफ्त्याकरिता १ हजार ८६६ कोटी ४० लाख वितरित करण्यात आले.

राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची लाभार्थी संख्या नेमकी किती याबाबत अजून स्पष्टता नाही.


कृषी विभागाची १६ ऑक्टोबर पर्यंत लाभार्थी पडताळणी यादी पुढीलप्रमाणे :-

  • पीएम किसान योजेनच्या १४ व्या हफ्त्याचे लाभार्थी :- ८५.६० लाख 
  • राज्यातील एकूण पात्र लाभार्थी :- 93.07 लाख 
  • भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेले लाभार्थी :- 1.15 लाख 
  • अद्ययावत लाभार्थी नोंदी :- 1.15 लाख 
  • बँक आधारसंलग्न प्रलंबीत लाभार्थी :- 5.98 लाख 
  • ई केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी :- 5.26 लाख    









टिप्पण्या