शेतमाल तारण कर्ज योजना...

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना :-

शेतकऱ्यांना सुलभ कर्ज  उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे शेतमाल तारण कर्ज योजना होय.
सदरील योजना हि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ १९९० पासुन राज्यातील बाजार समितींच्या माध्यमातुन शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण,सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात विविध प्रकल्प,योजना तसेच नवीन कार्यक्रम आखणे तसेच शेतकरी,शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे.
राज्यात कृषी मालाच्या निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्राची स्थापना करून हि केंद्रे सक्षमपणे चालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.कृषी पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात.त्यापैकीच एक म्हणजे शेतमाल तारण कर्ज योजना त्याविषयी सविस्तर माहिती पाहु या.. 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

   या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतमालाचे काढणी हंगामात शेतकऱ्यांस असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन या गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.  


योजनेची ठळक वैशिष्ट्ये:-  

बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इत्यादी खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड नाही तसेच शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत 6 टक्के व्याजदराने 6 महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध करुन दिले जाते त्याचप्रमाणे या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, हरभरा, धान, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका, बेदाणा, काजू बी, हळद, सुपारी व राजमा या शेतमालाचा समावेश आहे.

व्याज सवलत :- 

 
सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. स्वनिधीतून तारण कर्ज राबविणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते. योजना राबविण्यासाठी स्वनिधी नसलेल्या बाजार समित्यांना पणन मंडळाकडून 5 लाख रुपये अग्रिम उपलब्ध करुन दिला जातो. राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतकऱ्यांच्या मालाच्या वखार पावतीवर तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

मुदत व व्याजदर :- 


शेतमालाच्या प्रकारानुसार काजू बी व सुपारीसाठी बाजार भावानुसार एकूण किमतीच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 100 रुपये प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम 6 महिने मुदतीसाठी 6 टक्के व्याजदराने देण्यात येते तसेच राजम्यासाठी बाजारभावाच्या 75 टक्के अथवा प्रति क्विंटल रुपये 3 हजार यापैकी कमी असणारी रक्कम 6 महिने मुदतीसाठी 6 टक्के व्याजदराने देण्यात येते त्याचप्रमाणे बेदाणा पिकासाठी एकूण  किंमतीच्या कमाल 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 7 हजार 500 प्रति क्विंटल यातील कमी असणारी रक्कम 6 महिने मुदतीसाठी 6 टक्के व्याजदराने देण्यात येते.
कृषि पणन मंडळामार्फत 2022-23 यावर्षीच्या हंगामात राज्यातील 61 बाजार समित्यांनी 3 हजार 269 शेतकऱ्यांचा 1 लाख 47 हजार 293 क्विंटल शेतमाल तारणात स्विकारुन त्यांना एकूण 39 कोटी 98 लाख इतक्या रकमेचे तारण कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
बाजार समित्या व शेतकऱ्यांकडून योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून शेतमाल तारण कर्ज योजना ही राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ...





टिप्पण्या