आता ! व्हॉटसअॅप वरती सुद्धा कागदपत्रे करता येणार डाऊनलोड .....
🔊 » हो खरंच मित्रांनो,व्हॉटस अॅपवरील माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या मदतीने नागरिकांना डिजी-लॉकर सुविधा उपलब्ध होणार..
शासकीय सेवा सहज सुलभ उपलब्ध,व पारदर्शक आणि राखण्याच्या दृष्टीने डिजिलॉकर हे एक महत्वाचे ऍप आहे,ज्यामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही डिजिटली जतन करू शकता आणि आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही डाऊनलोड करू शकता,तसेच पुढचं पाऊल म्हणून नागरिकांना व्हॉटसअॅपवरील माय जीओव्ही हेल्प डेस्कच्या माध्यमातून डिजी-लॉकर सुविधा उपलब्ध करणार असल्याचे माय जीओव्ही मंचाने आज घोषित केले.
या अंतर्गत नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी व्हॉटसअॅप वरील माय जीओव्ही हेल्प डेस्क च्या माध्यमातुन सर्व शासकीय सेवा या नागरिकांच्या हातातील बोटावर मिळतील.
या सेवे अंतर्गत नागरिकांना पुढील कागदपत्रे हि डाऊनलोड करता येतील.
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना
- इयत्ता X वी उत्तीर्णता प्रमाणपत्र
- वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC)
- विमा संबंधित कागदपत्रे
- इयत्ता X वी गुण पत्रिका
- इयत्ता XII वी गुण पत्रिका
- गाडी संबंधित विमा कागदपत्रे
अशी करा कागदपत्रे डाऊनलोड :-
१. सर्व प्रथम तूम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये +91 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल.
२.त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉटसअॅप मधील कॉन्टॅक्ट रिफ्रेश करा.
३.सेव्ह केलेल्या नंबर वरती व्हॉटसअॅप मेसेज "नमस्ते अथवा हाय किंवा डीजी लॉकर " असा पाठवावा लागेल.
४.त्यानंतर हेल्प डेस्क चा रिप्लाय आल्यानंतर त्यामधील ऑपशन सिलेक्ट करून हवे ते कागदपत्रे डाऊनलोड करून घ्यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा