बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करणाऱ्या तीन नवीन योजना ...

 बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करणाऱ्या तीन नवीन योजना ..

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरीता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्याकरीता इयत्ता पहिली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरीता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरीता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरीता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे.आता या योजनांशिवाय नवीन तीन कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

कोणत्या आहेत तीन नवीन योजना :-

१ .महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत आहेत अश्या सर्व कामगाराच्या एका मुलीच्या विवाहसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 51 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

२.एखाद्या कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यु झाल्यास तर त्या बांधकाम कामगारास त्याचे शव मूळ गावी त्याच्या मूळगावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा जो खर्च येईल हा खर्च बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

३.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणी असलेला बांधकाम कामगार व तो त्याचं काम करत असताना अपघात होऊन हात किवा पाय निकामी झाल्यास त्यांना कृत्रिम हात किवा पाय बसवण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करणाऱ्या तीन नवीन योजना, bocw,Marathitechniks,tin navin yojana,bandhkam kamgar tin navin yojana,bandhkam kamgar yojana 2

राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

टिप्पण्या