Ayushman Bharat Digital Mission : आधार कार्डच्या मदतीने मिळणार हेल्थ कार्ड काय आहे ही योजना?

 

आरोग्य

HEALTH ID CARD 
क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची (NDHM) - म्हणजेच आयुष्मान भारत डिजिटल मोहीम ( Ayushman Bharat Digital Mission )  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला आहे.

 या योजनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील संबंधितांसाठी एक ऑनलाइन व्यासपीठ तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या व्यासपीठावर नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी आणि डेटाबेस ठेवण्याबरोबरच संपूर्ण आरोग्यसेवा मिळू शकेल. ‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे.

पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशनमध्ये प्रत्येक व्यक्तीला 14 क्रमांकांचा एक युनिक हेल्थ आयडी दिला जाईल. हा क्रमांक संबंधित व्यक्तीला हेल्थ आयडी असेल. व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती राष्ट्रीय आरोग्य आयडीमध्ये दिली जाईल. या डिजिटल प्रणालीमध्ये आरोग्याशी संबंधित वैयक्तिक माहितीची सुरक्षा, गोपनीयता आणि गोपनीयतेची काळजी घेतली जाईल.


१.     या हेल्थ कार्ड मुळे :- 

 1 ) हेल्थ कार्डमुळे नागरिकांना आपली आरोग्यविषयक सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. डॉक्टरांकडे जाताना कुठलीही फाइल घेण्याची जाण्याची गरज राहणार नाही. तसंच आपल्याला हव्या असलेल्या देशाच्या कानाकोपऱ्यातील कुठल्याही डॉक्टरकडून उपचार घेता येणार आहेत. डॉक्टरांनाही या हेल्थ कार्डमुळे रुग्णांची सर्व माहिती मिळणार असल्याने उपचार करणं सुलभ होणार आहे.

2 ) दुसऱ्या शहरांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये हेल्थ कार्ड किंवा युनिक आयडीने आपली कागदपत्र दाखवू शकतात. तसंच संबंधित व्यक्तीला कुठल्या सरकारी योजना योजना लाभ मिळतोय हेही कळेल. रुग्णाला आयुष्मान भारत योजनेनुसार लाभ मिळतोय की नाही, हे ही या कार्डवरून कळणार आहे.

3 ) या योजनेअंतर्गत नागरिकांना आधारच्या धर्तीवर एक युनिक हेल्थ आयडी मिळेल. 'आयुष्मान भारत - डिजिटल मिशन'मुळे आता देशभरातील रुग्णालये आरोग्यावरील उपचारासांठी डिजिटली एकमेकांशी जोडली जातील. या अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल

4 ) प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण मिळते.

5 ) हे युनिक हेल्थ कार्ड मोफत आणि ऐच्छिक स्वरुपाचे असेल. हेल्थ आयडी व्यक्तीचे मूलभूत तपशील आणि मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक वापरून निर्माण केला जातो

या कार्डमध्ये संबंधित रुग्णाच्या प्रत्येक चाचणीचा, प्रत्येक आजाराचा तपशील, ज्या डॉक्टरांना ते दाखवण्यात आले आहे, घेतलेली औषधे आणि निदान यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध असेल.


आधारकार्डाच्या धर्तीवर नागरिकांना मिळणार युनिक हेल्थ कार्ड :-

डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचे एक युनिक आरोग्य कार्ड बनवणार आहे. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल जे दिसायला आधार कार्डसारखे असेल. या कार्डवर तुम्हाला नंबर मिळेल, तुम्हाला आधार क्रमांकाप्रमाणे एक नंबर दिला जाईल. आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घेताना या क्रमांकाद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जाईल. या क्रमांकाद्वारे डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पार्श्वभूमी एका क्लिकवर उपलब्ध होईल. 


हेल्थ कार्डमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश?

सर्वप्रथम, ज्या व्यक्तीचा आयडी तयार होईल त्याच्याकडून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन नोंदींच्या मदतीने एक युनिक आरोग्य कार्ड तयार केले जाईल. सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि निरोगी केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न असलेले आरोग्य सेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीचे आरोग्य आयडी तयार करू शकतात.

तुम्ही https://healthid.ndhm.gov.in/register वर जाऊन स्वतःच नोंदणी करून माहिती भरून आपले हेल्थ कार्ड बनवू शकता. ज्या व्यक्तीचा आयडी तयार करायचे आहे त्याचा सर्वप्रथम मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक घेतला जाईल. या दोन नोंदींच्या मदतीने एक युनिक हेल्थ कार्ड तयार केले जाईल. तुम्हाला एक १४ अंकी युनिक आयडी मिळेल.


अधिक  माहितीसाठी हा व्हिडिओ  पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ....




टिप्पण्या