मुख्यमंत्री सहायता निधी

 


मुख्यमंत्री सहायता निधी :-


नमस्कार मित्रानो, या ब्लॉग मध्ये आपण मुख्यमंत्री साह्यता निधी या संदभर्त माहिती घेणार आहोत,मुख्यमंत्री

सहायता निधी हा राज्यातील तसच देशातील आपतीग्रस्ताना  सहयाताना देण्यासाठी  मुख्यमंत्री सहायता

निधी या मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

=========================================================================


सहायता योजनेची उद्दिष्टे :- 

       १ नैसर्गिक आपत्तीमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

२ दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किवा दुखापत जालेल्या व्यक्तीच्या वारसदाराणा आर्थिक स्वरूपात अथवा अन्य स्वरुपात मदत           करणे.

३ अपघातामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक स्वरूपात अथवा अन्य स्वरुपात मदत करणे.

४ आर्थिक किवा अन्य स्वरुपात मदतीची आवश्यकता विविध संस्थाना मदत करणे.

५ शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने यासाठी आर्थिक स्वरूपात अथवा अन्य स्वरुपात मदत करणे.

६ शैक्षणिक व वेद्यकीय आस्थापनाच्या बांधकामासाठी आर्थिक स्वरूपात अथवा अन्य स्वरुपात मदत करणे.

७ तसच या सर्व बाबी व्यतिरिक्त रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया /उपचार घेण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तीना त्यांचेवर करावा    लागणाऱ्या खर्चापोटी अर्थसहाय्य म्हणून आर्थिक स्वरूपात अथवा अन्य स्वरुपात मदत करणे.

===========================================================================

          रुग्णालयातून DISCHARGE घेतल्यानंतर त्या प्रकरणाची शहानिशा करणे कठीण असल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य दिले जात नाही

          रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना/आयुष्मान भारत / राष्ट्रीय बालक स्वास्थ कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही लाभार्थी असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही

          अर्जात दर्शवलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे स्व: साक्षान्कीत करून सोबत जोडणे आवश्यक आहे.

          संशयास्पद अथवा खोटी/  बनावट माहिती दिलेली आढल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसच तो कायेदशीर कार्यवाहीस पात्र ठरेल.

  

 ========================================================================

*मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप:*
अपघात किंवा आजरावरील उपचार खर्च किती होतो आहे, त्याच्या प्रमाणानुसार साधारणतः ५ हजारांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.

ही योजना महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या, ज्याचे उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये कमी असलेल्या सर्व नागरिकांसाठी आहे.

====================================================================

*योजनेच्या अटी:*

या योजनेसाठी लाभार्थ्यांना रुग्णालयाकडे तपशील द्यावा लागणार आहे. त्यामध्ये रुग्णालयाचा बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, बँक शाखा,आयएफएससी कोड,खात्याचे नाव आणि रुग्णालयाचा ई-मेल देने आवश्यक आहे.

====================================================================

अर्जा सोबत जोदावायची कागदपत्रे :-

१ अर्ज (विहित नमुन्यात )

२ वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मूळप्रत डॉक्टरच्या सही शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास सिविल सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे )

३ तहसीलदार कार्यालयाचा उत्पनाचा दाखला (उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये कमी असणे आवश्यक)

४ आधार कार्ड

५ राशन कार्ड

  संबधित आजाराचे REPORT

७ संबधित रुग्णालयाची नोंद हि मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असणे आवश्यक आहे.

 

मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज - https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf


===========================================================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २ ० २ ६

सारथी शिष्यवृत्ती करीता अर्ज सुरु....