रिक्षाचालक योजना :-
कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालक यांना
१५००रु. अर्थसहाय्य...
परवानाधारक रिक्षाचालक यांना एकवेळेचे
अर्थसहाय्य म्हणून १५००रु. अर्थसहाय्य
देण्याबाबत दिनांक १९-०४-२०२१ रोजी उपमुख्यमंत्री महोद्याच्या अध्यक्षतेखाली बेठक
घेण्यात आली,यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे,त्यासाठी रिक्षाचालकांना
त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक याची नोंदणी ही ओंनलाइन करायची
आहे.
ही नोंदणी
करण्याआधी काही सूचना दिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे,
१) यासाठी कोण अर्ज करू शकेल :- महाराष्ट्रातील
परवानाधारक रिक्षाचालक
२) आवश्यक कागदपत्रे :- वाहन क्रमांक,अनुज्ञप्ती क्रमांक
व आधार क्रमांक.
३) आधारद्वारे ओंनलाइन लाभ :-
१) या योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक असणे
आवश्यक आहे.
२) तसेच त्या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक
असणे आवश्यक आहे.
३)याचा फायदा आधार लिंक बँक खात्यात थेट वर्ग केला
जाईल.
४) कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण :-
यासाठी अर्जदाराने “वारसा/उत्तराधाकारी” हा पर्याय निवडावा लागेल व परवान्याची
प्रत अपलोड करावी लागेल.
५) अर्जाची स्थितीचा तपास :- मोबाईल नंबर वापरून अर्जाची स्थिती तपासू शकता.
v आधार अर्ज करण्यासाठी व मोबाईल नंबर अपडेटसाठी नोंदणी
केंद्राची यादी :- येथे क्लिक करा.
१) आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती तपासण्यासाठी :- येथे क्लिक करा.
२) आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकाची स्थिती
तपासण्यासाठी :- येथेक्लिक करा.
थोडक्यात
महत्वाचे अर्ज करण्याची वेळ :- सकाळी ८ ते रात्री १०
सामान्यतः विचारले
जाणारे प्रश्न :-
प्र.माझ्याकडे आधार कार्ड
नसल्यास काय करावे लागेल?
उत्तर: आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर कृपया
तुमच्या जवळच्या नोंदणी केंद्रात अर्ज करा. आपल्या जवळील आधार नोंदणी केंद्रे
तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
प्र.
माझा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नसेल तर काय करावे?
उत्तर: आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर सत्यापित
करण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा. आधारमध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी आपल्या जवळच्या
आधार अद्ययावत केंद्राला भेट द्या.
प्र.
माझे बँक खाते आधारशी जोडले गेलेले नसेल तर काय करावे?
उत्तर: आधार लिंक केलेल्या बँक खात्याची स्थिती
सत्यापित करण्यासाठी येथे क्लिक करा. आपण आपले बँक खाते आधारसह अद्ययावत करण्यासाठी आपल्या बँकेत
देखील भेट देऊ शकता आणि नंतर योजनेसाठी अर्ज करू शकता.
प्र.
मी आधार किंवा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर / बँक खात्याशिवाय योजनेसाठी अर्ज करू
शकतो?
उत्तर: होय, आपण अद्याप ऑफलाइन मोडद्वारे योजनेसाठी अर्ज करू
शकता. ऑफलाईन मोडद्वारे अर्ज करण्यासाठी ,
२४ मे २०२१ नंतर कार्यालयीन वेळेत कृपया आपल्या
आरटीओ कार्यालयाला भेट द्या.
प्र.
अर्ज करण्यासाठी मला मदत हवी असेल किंवा मी अर्ज करण्यास असमर्थ असल्यास काय?
उत्तर: तुम्ही येथे क्लिक करून वापरकर्त्याच्या मार्गदर्शकाचा संदर्भ घेऊ शकतात. आपण प्रक्रिया
व्हिडिओ येथे देखील तपासू शकतात.
प्र.
मी ऑनलाइन अर्ज केला आहे, मला
मदत निधी कधी व कोठे मिळेल?
उत्तर: आपल्या अर्जाचा आढावा घेतल्यानंतर आणि
अर्ज मंजूर झाल्यावरच तुम्हाला आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मदत निधी मिळेल.
प्र.
मला अद्याप मदत निधी मिळालेला नाही?
प्र.
माझा अर्ज नाकारल्यास काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज
नाकारल्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून
पुन्हा अर्ज करा.
प्र.
माझा अर्ज दुरुस्तीसाठी पाठविला गेला तर काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज दुरुस्तीस
पाठविण्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा
अर्ज करा.
प्र.
मी माझ्या अर्जाच्या स्थितीबद्दल समाधानी नसल्यास काय करावे?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा